Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ७ मे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला त्यांनी भेट देऊन आरोग्य अधिकार्‍यांशी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली.

दुसर्‍या लाटेत वर्धा, अमरावती, यवतमाळ, नाशिक येथील दौरे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीचा दौरा केला. त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट दिली आणि काही रूग्णांशी सुद्धा संवाद साधला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, अन्य लोकप्रतिनिधी-पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कोरोनाची स्थिती आणि उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीचा संसर्ग दर हा 20 टक्क्यांच्या वर आहे. प्रारंभीच्या काळात काही समस्या होत्या. पण, आता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. बेड्स आणि ऑक्सिजनची सध्या उपलब्धता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत मोठे आव्हान हे लसीकरणाचे आहे. आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज पसरविण्याचा काहींचा प्रयत्न. त्यावर जिल्हाधिकार्‍यांना काही उपाययोजना सूचविल्या. आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा यात योगदान देत आहेत. जेथे संभ्रम आहे, तेथे कार्यकर्त्यांनी आधी पुढे यावे, असा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी प्रशासनाच्या सोबत यासाठी उभी असेल.

गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव राज्य सरकारने लवकर केंद्र सरकारकडे पाठविला, तर केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू आणि त्यादृष्टीने गतीने पाऊले पडतील.

खा. अशोक नेते यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. वजनदार मंत्र्यांनी केवळ आपल्या जिल्ह्यांचा विचार करू नये, तर संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे, या भावनेतून काम करावे. हायकोर्टाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांचा विचार करावा, त्यातही मागास जिल्ह्यांकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे, अशी मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

हे देखील वाचा :

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना परस्पर दत्तक घेणे कायदयाने गुन्हा

लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.