Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉयड्स मेटल कंपनी कडून पूरग्रस्तांना मदत वाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 17 जुलै :-  अहेरी उपविभागात सर्वत्र मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नागरीकांना पुराचा फटका बसला आहे.पुराचे पाणी घरात शिरून अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंची कमी जाणवत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे हे ध्यानात घेऊन लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून खदान परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा देण्यात आला.

पुराच्या या आपत्ती मध्ये लॉयड्स मेटल कंपनीने समाजाप्रती असलेल्या सामाजिक दायित्वाची जाणीव लक्षात ठेवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- पूरपरिस्थितीमुळे बल्लारपूर शहरातील पाणी पुरवठा तीन दिवसापासून ठप्प; प्रशासनाचे दुर्लक्ष https://loksparsh.com/top-news/status-original-ballarpur-water-water-stopped-for-three-days-of-administration/27660/

Comments are closed.