“वाढदिवशी” शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी: वाढदिवस म्हटला की केक, खाऊ व इतर वस्तूंची रेलचेल असते. तालुका पत्रकार संघटनेची शैक्षणिक वाटप करण्याची प्रेरणा घेवून तसेच चालू परंपरेला फाटा फोडीत वेलगूर येथील उच्च प्राथमिक केंद्र शाळेतील कुमारी हार्दिका चुनारकर हिच्या वाढदिवशी पालकांनी नोटबुक, पेन्सिल व चॉकलेटचे वाटप करून शैक्षणिक आनंद विद्यार्थ्यांमध्ये रुजविला.
कार्यक्रमाझे अध्यक्ष तथा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष हर्षा चुनारकर यांनी आपले स्थान भूषविले.यावेळी वर्ग एक ते सातच्या सर्व मुला मुलींना नोटबुक, पेन्सिलचे वाटप केल्याने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनेचे सदस्य दीपक चुनारकर तथा वितरक होते. यशस्वीते करिता शिक्षिका मीनाक्षी कुमरे, वंदना एन्लावार , आईलावर ,रापर्तीवार यांनी तसेच मुख्याध्यापक प्रभाकर आचेवार व विनोद खांडेकर यांच्या मार्गदर्शनात सदर वाटप करण्यात आले.

Comments are closed.