Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पूरग्रस्तांना रिलायन्स फाउंडेशन मार्फत जीवनावश्यक साहित्याचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिरोंचा, दि. १७ ऑगस्ट : देशासह राज्यभरात जुलै महिन्यामध्ये सर्वत्र खूप जास्त पाऊस झाला. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. गडचिरोली जिल्हा याला अपवाद राहिला नाही. 

जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती नद्यांना महापूर आले. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील या नद्यांच्या काठावरील बऱ्याच गावांमध्ये पुराचे पाणी शिरले व गावातील घरांचे बरेच नुकसान झालेच शिवाय याचा गुराढोरानाही  चांगलाच फटका बसला. गावातील लोकांनी हाती मिळेल त्या साहित्यनिशी  स्थलांतर केले. जागा मिळेल तिथे लोक जिवाच्या आकांताने वस्ती  करून राहिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा परिस्थितीची दखल घेत रिलायन्स फाउंडेशन पूरग्रस्तांच्या  मदतीला धावून आले.त्यांनी सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार  जितेंद्र शिकतोडे यांच्या मदतीने रिलायन्स फाउंडेशनच्या  धम्मदीप गोंडाने व मनोज काळे यांनी पूरग्रस्त गावांची यादी करून या गावांची पाहणी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गावातील पूरग्रस्तांच्या  भेटी घेतल्या व त्यांना चांगल्या झोपड्या उभारता याव्या यासाठी ५०० ताडपत्र्याचे वाटप केले.

पूरग्रस्त भागामध्ये अनेकांचे घरी उध्वस्त झाल्याने जंगलात रस्त्याच्या कडेला आसरा घेण्यात आला आहे. मात्र पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चिखलमय वातावरण आणि वेळोवेळी होणारा पाऊस यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात मच्छर निर्माण झाले असल्याने पूरपिढी यांना सामना करावा लागत आहे.

अश्या आपदग्रस्त परिस्थितीची जाणीव झाल्याने पूरग्रस्तांना ५०० मच्छरदाणी वाटण्यात आल्या. या सर्व वाटप कार्यक्रमामध्ये त्या – त्या गावातील तलाठी, सरपंच त्याचप्रमाणे सौ. रंजना बोबडे, मंडळ अधिकारी, कृषी विभाग, सिरोंचा,  सचिन आत्राम कृषिसहाय्यक,  रवी बॉंगोई,  जगदीश वेलम , अमितकुमार त्रिपाठी यांचेही खूप सहकार्य लाभले.

हे देखील वाचा : 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द.

 

 

 

Comments are closed.