Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हापरिषद अनुकंपा प्रतिक्षायादीतील उमेदवारांची 22 ऑगस्टला दस्ताऐवज पडताळणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 20 ऑगस्ट – जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन २०२३ मध्ये पुर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांची अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती.
अनुकंपाधारकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, अनुकंपा तत्वावर नियुक्ती संबंधाने आवश्यक शैक्षणिक दस्ताऐवजाची दिनांक २२.०८.२०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता पडताळणी करण्यात येणार आहे. तरी प्रकरण पुर्ण असलेल्या अनुकंपाधारक प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांच्या दोन छायांकित प्रतीच्या संचासह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे उपस्थित रहावे.

प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांना केवळ दस्ताऐवज पडताळणीच्या प्रक्रियाकरीता बोलविण्यात येत असल्याने उमेदवारांना नेमणूकीकरीता हक्क प्रस्तावित करता येणार नाही. तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेगळयाने पारदर्शकता ठेवून राबविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये याची नोंद घ्यावी. असे शेखर शेलार उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.