गडचिरोली एसटी विभागातील कर्मचाऱ्यांनी मुंडन करून केला शासनाचा निषेध
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरनासाठी अहेरी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १७ नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करून अन्य मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून बेमुदत आंदोलन करीत आहे. आता अहेरी येथील आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मुंडन करीत घेत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी आणि गडचिरोली असे दोन आगार असून दोन्ही आगराचे कर्मचारी आंदोलन करीत आहे. मंगळवारी अहेरी आगारातील १० कर्मचाऱ्यांनी मुंडन केले. दररोज हे आंदोलन तीव्र होत असून मागण्या पूर्ण होण्याच्या कोणतेच चिन्ह दिसून येत नाहीत.
विशेष म्हणजे मुंडन करणाऱ्या व्यक्ती ने एक ही रुपया न घेता त्यांना सहकार्य केले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करून लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी अहेरी आगारातील आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांनी केली आहे.
हे देखील वाचा :
गडचिरोली सी -६० पोलीस जवानांचा गृहमंत्र्याच्या हस्ते गौरव , मर्दनटोला येथिल कामगिरीचे केले कौतुक.
 
						 
			 
											


Comments are closed.