कोंबडा बाजारात झुंज जुगाराचा फड, पोलिसांचा छापा
२.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जुगारबाज गजाआड.. चामोर्शी तालुक्यातील पोतेपल्ली रै येथील गावा लगतची घटना..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील दुर्गम भागात कोंबड्यांच्या झुंजींवर लाखोंचा सट्टा लावणाऱ्या टोळीवर रेगडी पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली असून २.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार ही कारवाई पार पडली.
पोतेपल्ली रै येथील जंगलात सुरू असलेल्या अवैध कोंबडा बाजाराबाबत गोपनीय माहिती मिळताच रेगडीचे पोउपनि. कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली.छाप्यात पाच दुचाकी, रोख रक्कम, कोंबडे व अन्य साहित्य असा एकूण २,२४,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळाले तरी सहा आरोपींना अटक करण्यात आली.त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोकुलराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.अवयव विक्रीप्रमाणेच या झुंजीही अनैतिक व क्रूर आहेत, त्यातून ग्रामीण भागातील तरुणांचे नुकसानच होते, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.
कोंबड्यांच्या झुंजीच्या नावाखाली लाखोंची उलाढाल सुरू असलेल्या या जुगार साखळीवर पोलिसांनी घातलेला छापा ही सामाजिक आरोग्यासाठी मोठी कृती मानली जात आहे.दुर्गम भागातील बेरोजगारी आणि संधी अभावी तरुण गोंधळलेल्या मार्गाला लागत आहेत, ही वेळीच थांबवण्याची गरज आहे.पोलीस दलाच्या या सक्रियतेमुळे जिल्ह्यात सट्टेबाजांच्या बळकटीला अटकाव होईल, अशी अपेक्षा आहे.
सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव
Comments are closed.