Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्करोगाने मृत पावलेल्या मेहता परिवाराला आर्थिक मदत

सामाजिक दायित्व हेच कर्तव्य; आष्टी येथील अमित चक्रवर्ती या युवकाचा निर्धार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विशेष प्रतिनिधी – सचिन कांबळे, नागेश इरबतूनवार

चामोर्शी, दि. ११ नोव्हेंबर : आष्टी येथील मेहता कुटुंबातील कर्ता माणूस कर्करोगाने मृत पावल्याने त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबाला अत्यंत हलाखीचा सामना करावा लागत होता. मात्र मेहता कुटुंब सक्षम नसल्याने परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन बाजूला असलेले छोटे उद्योग करून प्रपंच चालविणारे अमित चक्रवर्ती समोर येत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतक दिनेश मेहता हे मूळ आष्टी येथील असून मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजीविका पूर्ण करीत असतांनाच मृतक दिनेशला कर्करोगाने ग्रासले त्यामुळे दोन ते तीन वर्षापासून औषधोपचार चालू होता घरातील कर्ता माणूस लवकरात लवकर बारा व्हावा यासाठी सदैव घरातील असलेला पैसा, जागा विकून खर्ची घातला मात्र ईश्वराला वेळेच मंजूर असावे शेवटी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आधीच दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे रोजगार बंद असल्याने कामही मिळत नव्हते आणि त्यातच कर्करोगाने ग्रासल्याने औषधोपचारावार पूर्ण पैसे संपले. त्यामुळे होत्याचे नव्हते झाले. परिस्थिती अत्यंत बिकट स्थितीवर आल्याने पोटाची खडगी भरणेही कठीण झाले. घरातील कर्ता माणूस गमावल्याने परिवारावर काळाने झडपच घातली. हे सर्व पाहून आजूबाजूच्या परिवारांना हृदय हेलावणारी दृश्य समोर दिसत असले तरी ही आजूबाजूचे परिवारही मदत करू शकत नव्हते कारण ते ही मिळेल ते काम करून पोट भरीत असल्याने फक्त पाहून दुखः व्यक्त करीत होते. मात्र हीच गोष्ट तुटपुजात व्यवसाय करणारे अमित चक्रवर्ती यांना कळताच तात्काळ परिस्थितीची जाणीव लक्षात घेवून पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे आर्थिक चंचणीत सापडलेल्या मेहता कुटुंबाना मोठी मदत झाली असून त्यांच्या पश्चात पत्नी व तीन अपत्य आहेत. या कठीण परिस्थितीत अमित चक्रवर्तीनी जी  मदत केली ‘त्या’ मदतीने मोठे बळ मिळाले असल्याचे मृतकाची पत्नी योगिता दिनेश मेहता यांनी समाधान व्यक्त केले असून वेळप्रसंगी काही अडचण आल्यास पुन्हा आर्थिक मदत करण्याची ग्वाही सामाजिक दायित्वाची जाणीव असलेल्या अमित चक्रवर्ती केले आहे. याप्रसंगी अनुप चक्रवर्ती, नाशीकांत भसारकर, संदीप बोर्लावार, आदित्य काचमवार, शुभम दांडीकवार, किशोर बोर्लावार, ईश्वर बोलगीडवार आदी उपस्थित होते .

हे देखील वाचा :

इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती

अधिकारी व कर्मचा-यांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास नोव्हेंबरचे वेतन मिळणार

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध 

 

Comments are closed.