Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांचेवर निलंबन करण्यासाठीं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रधान सचिवांनाआदेश

चातगाव वनपरिक्षेत्रातील आर्थिक व्यवहाराची उच्च स्तरीय चौकशी सुरू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली १६ – गडचिरोली वनविभागातील चातगाव वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजात अनियमित्ता दिसून आल्याचे भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे.

चांतगाव वनपरिक्षेत्रात रोपवन, लागवड, खोदतळे,साहीत्य खरेदी , टिसीएमची कामे, कामावरील मजुर, मजुरांचे वावचर , यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आल्याने त्यांचे बैंक खाते पुस्तिका तपासून घेवून अन्य कामांची उच्च स्तरीय सखोल चौकशी करावी या करिता राज्याचे मंत्री वने ,व प्रधान सचिव वने यांना दि, ०६/०६/२०२४ ला लिखीत निवेदन सादर केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कामावर अनियमितता असल्याने प्रशासन स्तरावरुनवरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देताच कारवाईच्या भितीने मला कोणत्याही प्रकारची विचारणा न करता चातगावचे वनपाल परशुराम मोहुर्ले यांनी त्यांचे सांगण्यावरुन चातगाव वनपरिक्षेत्राचे विद्यमान वनपरिक्षेत्राधीकारी एस.बी.पडवे यांनी वनपाल मोहुर्ले यांचेकडे लाच स्वरुपात रुपये १०,०००/- रु. मला दि, २८/६/२०२४ ला फोनपे वर माझ्या लहान मुलांच्या खात्यावर जमा झाले. सदर पैसे कुठून आले याची आम्हाला कल्पना नव्हती तेव्हा पैसे पाठविलेल्या दुसऱ्याच दिवशी दि, २९/०६/२०२४ ला.चातगाव राऊंडचे वनपाल परशुराम मोहुर्ले यांनी मो.नं.,८०१०५४२७२५ या मो.नं.वरुन काल करुन माझ्या ९२८४९३३७२६ भ्रमणध्वनीवर काल करुन रुपये १०,०००/- पाठविल्याची माहिती दिली.तेव्हा तुम्हाला कुणी पैसे मागितले व मला लाच कशाला पाठविलात म्हणून बोललो व सदर प्रकरनी त्यांचे मो.नं.९४२३६७०३८३ व्हाटसप तुम्हाला पैसे न मागता मला लाच स्वरुपात पैसे का पाठविले या बाबत टाईप करून माहिती पाठविली.व सदर प्रकर्णी तात्काळ सखोल चौकशी करून मला लाच स्वरुपात रुपये १०,०००/ पाठविणाऱ्या वनपाल व वनपरिक्षेत्राधीकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करुन त्यांचेवर फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कठोर कारवाई करावी या करिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधान भवन मुंबई येथे दिनांक ०४/०७/२०२४ ला तर सचिव वने यांना दिनांक ०५/०७/२०२४ ला लिखीत निवेदन दिले.त्यानुसार मंत्री वने यांनी वनविभागाच्या प्रधान सचिवांना तात्काळ चौकशी करुन चार दिवसांत निलंबनाची कार्यवाही करण्याचें आदेश दिले.व सदर प्रकर्णी चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी सुरू असून चौकशी समिती पारदर्शी पद्धतीने चौकशी करतील की नाही अशी आशंका आहे.

विजय खरवडे
जिल्हाध्यक्ष भारतीय जनसंसद

त्या संदर्भात मुंबई मंत्रालयात दिनांक ११/०७/२०२४ ला प्रधान सचिव वने यांचे कार्यालयात मी प्रधान सचिव वने यांची भेट घेतली.तेव्हा त्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी वरुन गडचिरोली वनवृत्तातिचे वनसंरक्षक रमेश कुमार यांचेशी संवाद साधला व तक्रार निवेदनातील एकुण मुद्यावर पारदर्शीपणे सखोल चौकशी करावी अशी मौखिक सुचना दिली.मी चौकशी अधिकारी व्हिजीलन्स डिएफओ पाटोळे यांच्या सोबत झरी नियतक्षेत्रातील कक्ष क्रं.२०४ मध्ये राज्य व केंद्र शासनाच्या प्लान स्टेशनची मोका पाहणी केली असता शासन, प्रशासन व जनतेची दिशाभूल करत रोपवन लागवड सुरू असलेल्या जागेवरील कचरा व झुडपे साप केलेले नाहीत व जंगल असलेल्या जागेवर चुकीचे व कर्मचारी, अधिकारी यांचे संगनमताने स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामे करीत असल्याचे दिसून आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चातगाव वनपरिक्षेत्रात असे अनेक रोपवन लागवड नियमबाह्य असुन अवैध अतिक्रमण भरपुर प्रमाणात असु शकते.खोदतळे,पाणवटे यांची वनाधिकारी यांचे सोबत मी मोका तपासणी करणार आहे.तेव्हा जर का चौकशी दडविण्याचा प्रयत्न झाल्यास निवेदनातील नमुद मुद्दे निहाय चातगाव वनपरिक्षेत्राच्या सखोल चौकशी करीता वेळप्रसंगी लोकशाहीच्या मार्गाने जन आंदोलनाची वेळ आली तर जन आंदोलन उभारणार परंतु सन २०२१ ते सन २०२४ पर्यंतच्या चातगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या व सुरू असलेल्या एकुण कामांची व त्यांवरील आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्यास शासन, प्रशासनास वेठीस धरले जाईल.असे भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments are closed.