Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करून उर्वरित रक्कम माफ करा

- राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ३ मार्च :  महावितरण तर्फे शेतकऱ्यांना देण्यात आलेले अवाजवी वीज देयकाची रक्कम कमी करून उर्वरित रक्कम माफ करून दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी गुरुवारी महावितरणचे आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली .

मूलचेरा तालुक्यातील लभानतांडा येथील शेतकऱ्यांना ५ वर्षांपूर्वी कृषी पंप लावण्यात आले आहे. मात्र मागील नऊ महिन्यापासून बीज बिल मिळाले नव्हते. दिनांक २२ फेब्रुवारीला त्यांना मागील नऊ महिन्यांचे एकत्रित अवाढव्य वीज बिल देण्यात आले. ही रक्कम २६ ते ३१ हजाराच्या घरात असून एवढी रक्कम शेतकऱ्यांना एकत्र भरणे शक्य नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील दोन वर्षांपासून कोविड १९ रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्या उत्पन्न आणि विक्रीवर ही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून ज्या लोकांना वीज बिल देण्यात आले आहे. त्यांचे कृषी पंप मागील एका वर्षापासून बंद आहे. विद्युत विभागाचे कर्मचारी मीटर रिडींग साठी येत नसून अंदाजित बिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे.

हे शेतकरी एवढी मोठी विद्यूत बिलाची रक्कम भरण्यास सक्षम नाही त्यामुळे प्रत्येक शेतकरी ५ हजार रु भरण्यास तयार असून उर्वरित रक्कम माफ करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकिम व राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते बबलू हकीम यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आलापल्ली चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही निवेदन देण्यात येईल अशी माहिती शाहीन हकीम व बबलू हकीम यांनी दिली आहे. निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मण येर्रावार सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. लवकरच यावर दखल घेऊ असे आश्वासन यावेळी अभियंत्यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

हे देखील वाचा : 

अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत

रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका

 

 

Comments are closed.