Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज ३ मृत्यू तर ५८ नवीन बाधित, तर ६२ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दि.26ऑक्टोबर 2020

कोरोनामुळे तीन मृत्यूंसह जिल्हयात 58 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 62 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5336 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4389 वर पोहचली. तसेच सद्या 895 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 52 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन तीन मृत्यू मध्ये अहेरी येथील 70 वर्षीय पुरूष उच्च रक्तदाब पीडीत होते ते मृतावस्थेत दवाखान्यात दाखल झाले होते, त्याचा कोरोनारिपोर्ट पोसिटीव्ह आला.गडचिरोली गोविंदपुर येथील 65 वर्षीय महिला किडनी आजाराने ग्रस्त होती आणि तिसरी व्यक्ति ही गडचिरोली येथील मुरखळा मधील 68 वर्षीय पुरुष आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.25 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.77 टक्के तर मृत्यू दर 0.97 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 58 बाधितांमध्ये गडचिरोली 31, अहेरी 7, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 4, धानोरा 7, एटापल्ली 1, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 1 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन 58 बाधितांमध्ये गडचिरोली 31, अहेरी 7, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 4, धानोरा 7, एटापल्ली 1, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 1 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवीन दुर्गा माता मंदिराजवळ कॅम्प एरिया येथील 1, पोलीस स्टेशनच्या मागे 1, पोलीस स्टेशनमधील 2, विवेकनंद नगर 2, साईनगर धानोरा रोड 1, फुले वार्ड 1, मुरखडा 1, झेडपी शाळेजवळ चामोर्शी रोड 2, टी पाँईट येथे 1, जिल्हा सामान्य रुग्णालय 1, बट्टुवार कॉम्प्लेक्स मागे 1, सुभाष वार्ड जामा मस्जिद जवळ 1, को- ऑपरेटिव्ह बँक जवळ धानोरा रोड 1, आयटीआय चौक 2, रामनगर 1, कन्नमवार वार्ड राधे इमारती जवळ 2, स्थानिक 1, पोलीस संकुल 1, गोकुल नगर 2, पंचवटी नगर 1, रेव्हेन्यु कॉलनी 1, शाहु नगर येथील 1 जणाचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये श्रीराम चौक वार्ड क्र.1 आलापल्ली येथील 1, स्थानिक 5, पेरमिली 1 जणाचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, शंकरनगर 1 जणाचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये धोडराज 1 जणाचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, आंबेडकर चौक वार्ड क्र.5 आष्टी येथील 1 जणाचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये मेंढाटोला येथील 1, सीआरपीएफ जवान 6 जणाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये बोलेपल्ली येथील 1 जणाचा समावेश आहे. कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदरनगर येथील 1 जणाचा समावेश आहे व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये नगर परिषद जवळ 1 जणाचा समावेश आहे. तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे.

Comments are closed.