Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात ११ मृत्यूसह आज ५५९ कोरोनामुक्त तर २३९ नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 03 मे : आज जिल्हयात 239 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 22496 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 17662 वर पोहचली. तसेच सद्या 4386 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 448 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये 48 वर्षीय महिला मोहरली ता.मुलचेरा, 52 वर्षीय पुरुष मोहली ता.धानोरा , 65 वर्षीय महिला कनेरी गडचिरोली , 69 वर्षीय पुरुष नान्ही ता.कुरखेडा, 46 वर्षीय पुरुष वासाडा ता.आरमोरी , 70 वर्षीय महिला धानोरा, 65 वर्षीय महिला गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष विसोरा ता.वडसा , 26 वर्षीय महिला आरमोरी, 48 वर्षीय पुरुष वडसा, 65 वर्षीय महिला कोरची यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.50 टक्के तर मृत्यू दर 1.99 टक्के झाला.

नवीन 239 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 127, अहेरी तालुक्यातील 13, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 2, चामोर्शी तालुक्यातील 14, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 4, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 4, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 37 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 12 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 559 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 175, अहेरी 51, आरमोरी 24, भामरागड 29, चामोर्शी 40, धानोरा 25, एटापल्ली 31, मुलचेरा 12, सिरोंचा 14, कोरची 29, कुरखेडा 48, तसेच वडसा येथील 81 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.