गडचिरोली जलमय! मुसळधार पावसाने अहेरी-आलापल्लीचा संपर्क तुटला
लक्ष्मी नाल्याचा पूर रस्त्यावर, अहेरी-आलापल्ली संपर्क तुटला; नागरी जनजीवन कोलमडले..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २३ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात आज आकाशात दाटलेल्या काळ्याभोर ढगांनी सकाळपासूनच वातावरण होते. मात्र अहेरी उपविभागात ११.१५ वाजता मुसळधार पावसाचा अचानकपणे मुसळधार येणे सुरू झाले. काही तासांतच सारा परिसर जलमय झाला. अहेरी-आलापल्ली मार्गावरील लक्ष्मी नाल्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने दोन्ही शहरांचा संपर्क ग्रामीण भागाशी तुटला आहे. परिणामी, चाकरमानी, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक सेवेच्या वाहनांसाठीही मार्ग अडथळाग्रस्त झाला आहे.
शहरांतर्गत रस्त्यांवर खड्डे, अर्धवट ड्रेनेज कामे आणि निकृष्ट जलनिस्सारणामुळे पाणी तुंबून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक पाण्यात अडकले असून, चिखल व वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. काही भागांत नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आल्यानं अपघाताचे संभाव्य धोके निर्माण झाले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत ‘अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका’ असे आवाहन जारी केले आहे. तहसील व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संभाव्य पूरपरिस्थिती, आपत्कालीन मदत, आणि गरजूंना तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.