Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !

निसर्ग पर्यटनला चालना देण्यासाठी गडचिरोली वन विभागाचा अभिनव उपक्रम..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर : गडचिरोली शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या गुरवळा येथे वन विभाग गडचिरोली व संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळाच्या वतीने निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासह स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मिती व्हावी .यासाठी गुरवळा नेचर सफारीचे आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022 ला गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर , मिलिश शर्मा उपवनसंरक्षक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून निसर्ग नेचर सफारीचा शुभारंभ केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी  डॉ. किशोर मानकर यांनी नैसर्गिक वनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक नागरिकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.  संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत बेरोजगारिवर मात करण्यासाठी वन पर्यटन महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. पर्यटकांच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या विकासासह गावाचाही विकास करण्यासही मोठी चालना मिळणार आहे . त्यामुळे गावाचा विकास व  आर्थिकस्तर उंचावेल . त्यासाठी वन्यजीवांचे व वनाचे संरक्षण केल्यास  गाव  “सुजलाम सुफलाम “ होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही . गुरवळा निसर्ग  नेचर सफारीसाठी तसेच गावातील नागरिकांसाठी वनविभागाच्या वतीने सर्वोत्तम प्रयत्न करेन.  जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने पर्यटकांना निसर्ग सफारीचा मनमुराद आनंद मिळत असल्याने येणारे पर्यटकही आनंद व्यक्त करत असल्याचे प्रतिपादन डॉ. मानकर यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सोनल भडके, सहा-वनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली, दर्शना भोपये सरपंच ग्रा. प. गुरवळा, प्रकाश बांबोळे उपसरपंच ग्रा. प. गुरवळा, निलेश गेडाम अध्यक्ष स. व. व्य. समिती गुरवळा, रमेश मेश्राम अध्यक्ष स. व. व्य. स. हिरापुर , छायाताई बांबोळे , रमेश तुरे सदस्य JFM समिती गुरवळा, रायपुरे सर नवयुग विद्यालय गुरवळा आदीची उपस्थित होती .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय जनबधू क्षेत्रसहायक गुरवळा, गुरू वाढई वनरक्षक गुरवळा,  दुर्गमवांर वनरक्षक गुरवळा, प्रियंका रायपुरे वनरक्षक गुरवळा, संपूर्ण वन कर्मचारी तसेच गुरवळा नेचर सफारी गाईड यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

फडणवीस दिल्लीत ! कोशारीना मिळणार नारळ ?

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी

 

Comments are closed.