Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुणे येथे आयोजित 19 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाने पटकावली पदके

घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात सिल्वर व ब्राॉझ तसेच श्वानपथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात ब्राॉझ अशी तीन पदके पटकावली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पुणे :- पुणे येथे दिनांक 07 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत 19 वे राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात गडचिरोली पोलीस दलातीत बीडीडीएस शाखेतील धम्मदिप मेश्राम हे सिल्वर व पंकज हुलके हे ब्राॉझ पदकाचे मानकरी ठरले. यासोबतच गडचिरोली पोलीस दलातील हनी या श्वानाने श्वान पथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात ब्राॉझ पदक पटकाविले.

महाराष्ट्र राज्यात शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगारीचे स्वरुपही बदलत चाललेले आहे. त्यातच वेगवेगळा बंदोबस्त आणि तुलनेत अपुरे पोलिस बळ, अशा स्थितीत 24 तास ऑन ड्युटी राहणारे पोलिस आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. कंट्रोल रूम असो की पोलिस ठाणे कोणत्या क्षणी कोणती माहिती वा तक्रार पोलिसांकडे येईल, याचा नेम नसतो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीसांना नेहमीच सज्ज राहावे लागते. युद्ध कोणतेही असो सैनिक हा संपूर्ण साहित्यानिशी सज्ज असावा लागतो तरच, युद्ध जिंकता येते, हा साधा सरळ तर्क आहे. त्यामुळेच पोलिसांना अधिक सक्षम व अपडेट होणे अत्यावश्यक बनले आहे. पोलिसांनी कौशल्याने तपास कसा करावा; तसेच विविध प्रकारचे ज्ञान मिळावे, त्यांनी अपडेट राहावे, यासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा मेळाव्या मागील उद्देश असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या मेळाव्यामध्ये एकुण 25 वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये गडचिरोली पोलीस दलास सातवे स्थान मिळाले आहे. पुणे येथे आयोजीत 19 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक, श्वान पथक इ. स्पर्धा घेण्यात आल्या.

या सर्व स्पर्धेमध्ये लेखी, तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आले असून, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले. सहा दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्राला पाच बक्षिस मिळाले असून घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात गडचिरोली पोलीस दलातीत बीडीडीएस शाखेतील धम्मदिप मेश्राम हे सिल्वर व पंकज हुलके हे ब्राॉझ पदकाचे मानकरी ठरले. यासोबतच गडचिरोली पोलीस दलातील हनी या श्वानाने श्वान पथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात ब्राॉझ पदक पटकाविले. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पदक प्राप्त जवानांचे व श्वानाचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.