Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लग्न करा शुभ मुहूर्तावर.

मंगलकार्यालये, सभागृहे आरक्षित…..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ८ डिसेंबर : तुळशी विवाह आटोपला असून यावर्षी नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत दाते पंचांगानुसार ५३ दिवस लग्नतिथी आहेत. टाळेबंदीमुळे थांबलेले विवाह थोडक्यात उरकले जात आहेत.
कोरोनामुळे मार्च ते मे महिन्यादरम्यानचे लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले होते. यातील काहींनी जून ते ऑक्टोबरपर्यंत साध्या पद्धतीने विवाह पार पाडले. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या  विवाह सोहळ्यांची रेल्वेत तुळशी विवाहानंतर सुरू झाली आहे. लग्नसोहळ्यांमुळे बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण होऊन आर्थिक उलाढालीला गती मिळत आहे. याशिवाय याच व्यवसायाशी निगडीत घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. लग्नसमारंभ पार पाडताना वऱ्हाडडींना शासकीय नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना जसजसा कमी होईल तशी लग्नांमधील धूम वाढणार आहे. काही लोकांना मुहूर्ताचे महत्व नसते. पण बहुतांशी लोक मुहूर्त पाहिल्याशिवाय लग्न करीत नाहीत. आता लग्नसराईचे शुभ मुहूर्त आल्याने लगीनघाईसुरू झाली असून धुमधडाक्यात शुभमंगल सावधान होत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुखाच्छदात हेच प्रभावीसाधन आहे. लग्नसमारंभासाठी
मंगल कार्यालयात वऱ्हाडडींची गर्दी होते.वऱ्हाडींपैकी बहुतेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. त्यामुळे वऱ्हाडडींच्या तोंडावरील मास्कची जबाबदारी आता मंगलकार्यालय चालक आणि मालकांवर टाकण्याचे नागपूर महानगरपालिकेने ठरविले आहे. याबद्दल मंगलकार्यालयाशी संबंधीत असलेल्यांशी चर्चा केली जाणार असून एक आदेश त्यांच्या नावे काढला जाणार आहे.
विवाह मुहूर्त :
डिसेंबर२०२०-७,८,९,१७,१९,२३,२४,२७.
जानेवारी २०२१ – ३,५,६,७,८,९,१०.
फेब्रुवारी २०२१ – १५, १६.
एप्रिल २०२१- २२,२४,२५,२६,२८,२९,३०.
मे २०२१- १,२,३,४,५,८,१३,२०,२१,२२,२४,२६,२८,३०,३१.
जून २०२१.- ४,६,१६,१९,२०,२६,२७,२८.
जुलै २०२१- १,२,३,१३.

Comments are closed.