Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गोंडपिपरी यंग ब्रिगेड चा पाठिंबा.

गोंडपिपरी, दि. ८ डिसेंबर: केंद्रसरकारने घाईघाईने कुणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. हे कायदे रद्द करावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला गोंडपीपरी यंग ब्रिगेड ने पाठिंबा दिलेला आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर ला देशव्यापी बंदचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान यांना करत यंग ब्रिगेड ने भारत बंद ला पाठिंबा दिला. यावेळी यंग ब्रिगेड गोंडपीपरी चे संस्थापक अध्यक्ष सुरज माडूरवार, निकेश बोरकुटे तालुका कार्याध्यक्ष, गौरव घुबडे शोशल मिडीया प्रमुख, माजी उपसरपंच अमित फरकडे, तालुका सचिव प्रमोद दुर्गे, विठलवाडा अध्यक्ष संतोष उराडे, नभात सोनटक्के, नंदकिशोर बोरकुटे, प्रशांत कोसनकर, प्रतिक फलके, वैभव गिरसावळे, रितेश बट्टे, प्रदीप झाडे यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थित होती.

Comments are closed.