Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंतर विद्यापीठ वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या मुलींचा संघ विजयी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 20 एप्रिल : सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वूडबॉल मुलींच्या स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावलाय. या संघात प्राजक्ता धोंगडे, डिंपल प्रधान, प्रियांका यादव, प्रियांशू यादव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी. पूनम प्रधान-एन.एच.महाविद्यालय, ब्रह्मपुरी, एकता खांडोकर -एन. एस. महाविद्यालय, भद्रावती, मृणाली बोरकर -सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही, साक्षी तेलंग – आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर या मुलींचा समावेश होता.

त्यांनी उत्तम प्रदर्शनाचे श्रेय प्रशिक्षक शाहरुख रहीम शेख,अक्षय कुशल धोंगडे ,दिव्या सोमेश्वर धोटे ब्रह्मपुरी व विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांना दिले आहे. त्यांच्या या यशासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.