गोंडवाना विद्यापीठात 25 व 26 मार्च रोजी होणार संविधानाचा जागर दोन दिवसीय संविधान परिषदेचे आयोजन
ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या हस्ते होणार उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: भारतीय संविधानाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त, गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘संविधान सन्मान महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवातंर्गत दि. 25 व 26 मार्च रोजी दोन दिवसीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, या परिषदेमध्ये विविध कार्यक्रमाद्वारे संविधानाचा जागर होणार आहे.
सदर परिषदेचे 25 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. ज्येष्ठ संविधान तज्ज्ञ ॲड. डॉ. सुरेश माने यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या परिषदेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संविधान परिषदेस नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे. सदर संविधान परिषदेचे संपूर्ण नियोजन गोंडवाना विद्यापीठातील संविधान सन्मान महोत्सव समितीने केले असून परिषदेमध्ये पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.
संविधान दिंडी:
25 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता संविधान दिंडी चे आयोजन करण्यात आले असून, सदर संविधान दिंडी गोंडवाना विद्यापीठ-जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय ते गोंडवाना विद्यापीठ या मार्गावरुन निघणार आहे.
परिसंवाद:
दुपारी 12.30 वा. भारतीय संविधानाला अपेक्षित लोकशाहीचे स्वरुप या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष डॉ. दिलीप चव्हाण हे राहणार आहेत तर डॉ. भिमराव वाघमारे, डॉ. संतोष बनसोड, डॉ. नरेंद्र आरेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी 03.00 वा. संविधान मुल्यांच्या प्रचार आणि प्रसारात माध्यमांची भूमिका या विषयावर पॅनेल चर्चा होणार असून प्रमोद काळबांधे हे अध्यक्ष राहणार असून रोहिदासजी राऊत, राजेश येसनकर, संजय रामगीरवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
आम्ही भारताचे लोक या सांस्कृतिक कार्यक्रमाची विशेष मेजवाणी:
संविधान परिषदेमध्ये 25 मार्च रोजी सायं 6 वाजता नागपूर येथील बोधी फौंडेशनच्या आम्ही भारताचे लोक या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गीते व नृत्य यांच्या माध्यमातून संविधान तसेच राष्ट्रपुरुषांविषयक जाणीव जागृती करण्यात येणार असल्याने नागरीकांसाठी निश्चितच ही एक विशेष मेजवाणी ठरणार आहे.
दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भारतीय संविधान आणि युवकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद होणार असून अविनाश पोईनकर हे अध्यक्षस्थानी राहणार असून प्रेम जोरपोतवार, तुषार दुधबावरे, तृप्ती भैसारे, अरबाज शेख हे आपली मते व्यक्त करणार आहेत.
दुपारी 2 वाजता भारतीय संविधान आणि महिला या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये ॲड. पारोमिता गोस्वामी या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर ॲड. पद्माताई चांदेकर, ॲड. अंजली साळवे (विटनकर) व डॉ. प्रिया गेडाम ह्या आपले विचार व्यक्त करणार आहेत.
सायं.4.00 वा. समारोपीय कार्यक्रमामध्ये स्वप्नील फुसे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Comments are closed.