सरकार निवडणूक घेण्यासाठी घाबरतय – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी घेतला मुंबईतल्या शाखांचा आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 5 ऑगस्ट :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई विभागातील शाखांचा आढावा आजपासून घ्यायला सुरुवात केलीय. आज पहिल्या दिवशी भायखळा, वरळी आणि प्रभादेवी मधील काही शाखांमध्ये भेटी देऊन शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि पदाधिकार्यांच्या भेटी घेऊन आदित्य ठाकरे यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतलाय. तसेच शाखांमधल्या कामकाजाचाही आढावा घेतला आहे. मुंबईतील इतरही शाखांमध्ये अश्या भेटी आज पासून पुढे आदित्य ठाकरे देणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना ते असे म्हणालेत की ‘आपण केलेली कामं घरा घरा पर्यँत, मतदारांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवा आणि केलेल्या कामाची माहिती द्या. नवीन मतदार यादीत मतदार राजांची नोंद वाढवा ” तसंच हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार पडणार. त्यामुळे आपण केलेल्या कामाची पोचपावती घरा घरापर्यंत पोहोचवा आणि मतदार राजाला जागृत करा असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच “हे सरकार निवडणुकीला घाबरतय, ज्या नगर विकास मंत्र्यांनी नवीन वार्ड रचना जाहीर केली होती , त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वार्ड रचना रद्द केली, त्यामुळे हे सरकार निवडणुकिला घाबरलय ” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हे देखील वाचा :-
छत्तिसगडच्या सुकमा येथील जहाल महीला नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात…
Comments are closed.