Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. श्रवण लॉन, सिंदेवाही येथे नागपूरहून आगमन व राखीव. स. 11.15 वा. नगरसेवकांच्या बैठकीस उपस्थिती. दु.12.30 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. सिंदेवाही वरून ब्रम्हपुरीकडे प्रयाण. सायं. 6 वा. ब्रम्हपुरी येथील निवासस्थानी आगमन. सायं. 6.15 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ब्रम्हपुरी येथे मुक्काम.

दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9.30 वा. ब्रम्हपुरी येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. ब्रम्हपूरी वरून व्याहाड खुर्द ता. सावली कडे प्रयाण. दु.2.15 वा. पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय, व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. साय. 7.30 वा. व्याहाड खुर्द येथून गडचिरोलीकडे प्रयाण.
दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी दु. 1 वा. चंद्रपूर येथे गडचिरोलीहून आगमन व चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दु. 2.30 वा. चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.
दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन व राखीव. दुपारी 2 वा. नगरसेवकांसमवेत बैठकीस उपस्थिती. दु. 3.30 वा. धारिवाल पॉवर प्रोजेक्ट ताडाळाच्या कंत्राटी कामगारांच्या समस्येबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. साय. 5 वा. चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.