Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भोकर मध्ये तब्बल अकरा लाखाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने दहा चाकी ट्रक भोकर येथून सोमठाणा मार्गे कुबेर येथे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या गुप्त माहितीच्या आधारे स्थानी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत भोकर मध्ये तब्बल 11 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या कारवाईत एक दहा चाकी ट्रक वाहनासह एकूण 38 लाख 93 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी आरोपी विरोधात भोकर पोलीस ठाण्यात सह पोलीस उपनिरीक्षक संजय विश्वनाथ केंद्र यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने एका दहा चाकी ट्रक क्रमांक RJ ११GB८२२५ या ट्रकमध्ये भोकर येथून कुबेर कडे तस्करी होत असल्याची माहिती गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक जयवंतसिंग शाहू यांना सूचना देऊन कारवाईत करणेबाबत आदेशित केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर आदेशानुसार शाहू व त्यांच्या सहकार्याने उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण सह पोलीस उपनिरीक्षक मारुती तेलंग पोहेकाॅ जांभळीकर पद्मसिंग कांबळे व चालक शिंदे यांनी 24 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सोमठाणा गावाजवळ मिळालेल्या गुप्त माहितीवरूनRJ ११GB८२२५ या नंबरचा ट्रकला पोलीस पथकाने थांबून ट्रक चालकाकडे विचारपूस केली असता चालक शकील अहमद अब्दुल मजीद यांनी सांगितले की ब्रह्मपुरा बॉर्डर येथून भरलेला माल नांदेड मार्गे भोकर येथून पुढे आंध्र प्रदेश कडे नेण्यास सांगितले आहे ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये प्लास्टिक साहित्य बूट चप्पल व साप इतर साहित्य असल्याचे सांगितले तपासणी अंतर्गत तंबाखूजन्य व गुटखा पदार्थ आढळून आला हा माल कोणास घ्यायचे आहे .

याबाबत ट्रक चालकास काही माहीत नसल्याने ट्रक चालकाकडून सांगण्यात आले यावरून पोलिसांनी गुटख्याने भरलेल्या ट्रक भोकर पोलीस ठाण्यात आभारात आणून तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला असलेल्या प्रती बोरी किंमत 36 हजार 864 रुपये प्रमाणे असे एकूण 11 लाख 5 हजार 920 रुपयाचा माल जाफरानी जर्दा असलेला प्रतिबोरी किंमत 48 हजार रुपये प्रमाणे एकूण दोन लाख 88 हजार रुपयाचा व एक टाटा कंपनीचा 2818 सी मॉडेलचा उंच बॉडीचा व उंच कॅबिनचा दहा चाकाचा ट्रक ज्याची किंमत 25 लाख आहे पासिंग नंबरRJ ११GB८२२५ अशा वर्णन चा ट्रक प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असताना आढळून आला असा एकूण 38 लाख 93 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाळ स्थानी गुन्हे शाखेने जप्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणी आरोपी विरुद्ध 24 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री उशिरा सह पोलीस उपनिरीक्षक संजय विश्वनाथ केंद्रे गौतम यांच्या फिर्यादीवरून कलम३२८.२७२.२७३.१८८.भा.द.वि३६(२)२७.२३.३०(२)(अ)५९(iv) अन्न सुरक्षा मानके कायदा २००६नियम व नियमन२०११ अन्वये भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :-

रामदेव बाबाचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान ! सर्वत्र संतापाची लाट !

महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु – तीन मालमत्ता सील व एक ड्रेनेज खंडन

Comments are closed.