विविध क्षेत्रातील स्त्री शक्तीचा “सुपर वूमन अवॉर्ड” देऊन सन्मान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंदिया, दि. २४ डिसेंबर : महिलांनी आपल्या मनात घेतलं तर ते काही पण करू शकतात. त्यांना आलेल्या अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या कार्यकुशलतेच्या माध्यमाने विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट सेवा देत आहेत अश्या विविध क्षेत्राच्या महिलांचा स्थानिक पवार बोर्डिंग च्या सभागृहात युवा कुणबी संघटना गोदिंया व युवा पर्व सुपर वूमन व सिद्धिविनायक एज्युकेशन इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुपर वूमन अवॉर्ड २०२१ देऊन स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आले.
देशातील १४ राज्य आणि ११ हजार किलोमीटर चा प्रवास करून ज्या महिलांनी इतिहास रचला त्या खासदार सुनील मेंढे यांच्या धर्मपत्नी शुभांगी सुनील मेंढे व त्यांच्या सोबत प्रवास पूर्ण करणाऱ्या डॉ. प्रीती चोले सह शैक्षणिक क्षेत्रात डॉ. इंदिरा सपाटे, कृषी क्षेत्रात सुनीता धनराज भाजीपाले, सामाजिक क्षेत्रात डॉ सविता बेदरकर, आरोग्य क्षेत्रात डॉ. प्रज्ञा सोनारे, व्यावसायिक क्षेत्रात वर्षा भांडारकर, क्रीडा क्षेत्रात माया राघोर्ते, समाजासाठी विशेष कार्या करीता शारदा ब्राह्मणकर मंजुषा फुंडे या सर्व महिलांचा सुपर वूमन अवॉर्ड २०२१ देउन सत्कार करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक कल्पनाताई विजय बहेकार ,अध्यक्षस्थानी मीनाक्षीताई शैलेश अहिरकर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ ऋचा ढोणे, नंदा राऊत, शारदाताई ब्राह्मणकर, रिताताई बागडे विचार पीठावर होते. यावेळी महिलांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच समाज प्रबोधन करणारे एकपात्री प्रयोग, पथनाट्य, लोकगीत, लोकनृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रमोद गुडधे यांचा तर सहकाऱ्याकरिता सिद्धिविनायक एज्युकेशन इन्स्टिटयूट चे अतुल कडू यांचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान युवा कुणबी संघटनेचे सचिव गजेंद्र फुंडे, दुलीचंद बुद्धे, लीलाधर पाथोडे, लक्ष्मणराव गुडधे, सुधीर बागडे, दिनेश बहेकार, नितीन फुंडे, सुशांत कुथे, प्रदीप चामट, शैलेश अहिरकर, अनिल सेलूकर, चुन्नीलाल ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता मंजुषा फुंडे, प्राची गुडधे, प्रभा बुद्धे, अर्चना ठावरे, मंदा गायधने, स्नेहल तरोणे, नम्रता फुंडे, योगिता ठावरे, वैशाली ब्राह्मणकर, वर्षा कुंभारे, हर्षा माईंदे, मीनाक्षी पाथोडे, मोहिनी दोनोडे, शांता मेंढे, मोनिका ब्राह्मणकर, योगिता शेंडे, शिल्पा मटाले, भरती कुत्तरमारे, पूजा राऊत, निशा राखडे, माया बहेकार आदीने अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन स्मिता कुथे ,चारुशीला भांडारकर व ज्योत्सना कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन केशरी वराडे यांनी केले.
Comments are closed.