Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमच्या पोलिसांचा मला अभिमान; गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १३ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती–कोटगुल, मरदिनटोलाच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.

“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :

मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा

मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू

 

 

Comments are closed.