Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर :
धानोरा तालुक्यात येत असलेल्या ग्यारापत्ती–कोटगुल, मरदिनटोलाच्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास झालेल्या  चकमकीत २६ नक्षल्यांना खात्मा करण्यात गडचिरोली पोलीसांना मोठे यश प्राप्त  झाले असले तरी चकमकी दरम्यान चार पोलीस जवान जखमी झाल्याने त्यांना हेलिकॉप्टरने  नागपूर येथील आरेंज सिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

दरम्यान आज झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नसली तरीही यामध्ये नक्षल दलमचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती–कोटगुल जंगल, मरदिनटोलाच्या परिसरात सकाळी  ही चकमक सुरु होती. या परिसरात अजूनही पोलिसांकडून सर्चिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापला असल्याने संपर्क बाहेर करणे ही कठीण होत आहे.

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती–कोटगुल, मरदिनटोलाच्या जंगल परिसरात काही नक्षल्यांची हालचाल सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारच्या रात्रीपासूनच पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना त्या जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला असता नक्षल्यांना जशाच तसे प्रतिउत्तर पोलिसांनी दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या चाललेल्या दिवसभराच्या धुमश्चक्रीत २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून २६ मृतदेह हस्तगत केले असून पुन्हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाने नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून अधिक जवानाचा फौजफाटा घटनेस्थळी दाखल झाला आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी: पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा?

मोटारसाईकलची बैलबंडीला जबर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू

 

 

 

Comments are closed.