Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 12 कोरोनामुक्त तर 11 कोरोना बाधितांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात मृत्युचा आकडा शुन्यावर तर सक्रीय रुग्णांची संख्या 150 च्या खाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि.13 जुलै : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला आहे. तसेच दिवसेंदिवस सक्रीय रुग्णांची संख्यासुध्दा कमी होत आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 11 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 11 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 3, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 1, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 847 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 170 झाली आहे. सध्या 144 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 83 हजार 265 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 94 हजार 925 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1533 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना

….धानाचा भुसा घेऊन येणारा ट्रक पलटला; अपघातात एक ठार तर तीन जखमी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.