Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुरखेडा तालुक्यातील धानोरी ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित .

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील धानोरी येथील आयोजित ग्रामसभेत गावातील अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. तसेच निर्णयाचे उल्लंघन करून दारूविक्री करताना आढळून असल्यास संबंधित विक्रेत्याकडून ५० हजारांचा दंड ठोठावण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला.
धानोरी येथे अवैध दारूविक्री होत असल्याने दारूविक्रीची समस्या गावाच्या विकासात आडकाठी निर्माण करीत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी नुकतीच आयोजित ग्रामसभेत दारूविक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने दारूविक्रीचे नुकसान ग्रामस्थांना पटवून दिले. त्यानंतर सर्वानुमते गावात दारूविक्री नको, असे गावकऱ्यांनी ठरविले. त्यासाठी दारूबंदीचा ठराव पारित करून पुन्हा गावात दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांना ग्रामपंचायतद्वारे देण्यात येणारे कागदपत्र बंद तसेच ५० हजारांचा दंड देखील वसूल करण्याचा ठरविण्यात आले. दरम्यान, निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दारूबंदी संघटना गठीत करण्यात आली. तसेच मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटना देखील गठीत करण्यात आली.
सदर ग्रामसभा ही माधव धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला सरपंच मीनाक्षी गेडाम, ग्रामसेविका प्रज्ञाताई फुलझेले, उपसरपंच सीमा मोहुर्ले, संदीप नैताम, प्रमोद तुलावी पोलीस पाटील, गोपाल बनसोड, निळू कल्लो, केवळराम मांदाळे, संदीप तुलावी, उमाजी तुलावी, कमल गुरनुले, कविता सयाम, उज्वला मेश्राम, प्रेमिला गुरनुले, उषा गुरनुले, मनीषा धुर्वे, संजना मोहुर्ले, देवला धुर्वे, शारदा शिंदे, सुनिता सयाम, यामीना तुलावी, भूमिता मोहुर्ले, मुक्तिपथ तर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम व तालुका प्रेरक जीवन दहीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

One attachment • Scanned by Gmail

Leave A Reply

Your email address will not be published.