Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिवाळ्यात आहारामध्ये थंडीपासून आपले रक्षण करणाऱ्या गोष्टींचे सेवन करा शरीर आतून उबदार राहील.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ऋतू कोणताही असो, आहार पौष्टिकतेने परिपूर्ण असेल तर निरोगी आणि तंदुरुस्त राहता येते. मात्र ऋतूचे तापमान लक्षात घेऊन गरम किंवा थंड गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे हिवाळ्यात  बाहेरील वातावरणात थंडावा व सूर्यप्रकाश कमी असल्याने सर्दी, अंगदुखी, खोकला, खवखव अशा समस्या होतात  तसेच आपण थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालतो. परंतु उबदार कपडे घालणे आवश्यक नाही, तर त्याचबरोबर थंडीपासून आपले रक्षण करणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे देखील आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात गरम असलेल्या  पदार्थांचा समावेश करा जे तुमचे शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करतीलच त्याचबरोबर पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील उपयुक्त असतील, यामुळे तुम्हाला  हिवाळ्यात उबदार ठेवण्यास मदत करतील. तसेच  हंगामी आजारांपासून दूर राहील.

chandrpur vejitable market

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हिवाळ्यात तुमच्या आहारात मेथी, चवळी आणि मोहरीच्या हिरव्या पानाची भाजी या तीन हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. या भाज्या  खायला स्वादिष्ट लागतात, शिवाय त्यांच्या सेवनाने शरीराला आतून उष्णता मिळते. हिरव्या भाज्यांमध्ये तेलाचा फारसा वापर होत नाही त्यामुळे पोषणमूल्य व  रोगप्रतिकारशक्ती वाढून शरीर निरोगी राहते , त्यामुळे फिटनेसच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.

 

हिवाळ्यात आहारात बदाम आणि अंजीरचा समावेश करा. या दोन्ही गोष्टी पोषक तत्वांचा चांगला स्रोत असून त्यांचा प्रभावही उष्ण असतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीराला आतून उष्णता मिळेल. याशिवाय स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासोबतच योग्य पचन, वजन सांभाळणे असे अनेक फायदे होतील. तुम्ही दररोज आळशीच्या  बिया भाजून अर्धा किंवा एक चमचा भाजलेल्या बियांचे सेवन करा   तसेच हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी आहारात मर्यादित प्रमाणात गुळाचा समावेश करा. रोज थोडासा गूळ खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो, तसेच पचनक्रियेला फायदा होतो आणि शरीरात रक्त तयार होण्यास ही मदत होते. यात व्हिटॅमिन सी देखील थोड्या प्रमाणात असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तिळ शरीरासाठी खूप फायदेशीर देखील आहे. थंडीच्या या दिवसात अनेक लोकं शरीर उबदार राहण्यासाठी त्यांच्या आहारात तिळाचे लाडू बनवून त्याचे रोज सेवन करतात. तुम्ही तीळ भाजून खाऊ शकता. हे कॅल्शियम प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. तीळ भाजण्याऐवजी भिजवून खाणे चांगले मानले जाते. ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी तीळ मर्यादित प्रमाणात खावे.

 

 

Comments are closed.