Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी 18321 लाभार्थिनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेतल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकसपर्श नेटवर्क 

गडचिरोली: जिल्ह्यात आज हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या ७ तालुक्यात हत्तीरोग आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून १०० टक्के पात्र नागरिकांना डी.ई.सी., अल्बेंडाझोल सोबतच आयवरमेक्टीन गोळ्या या तीन औषधांची मात्रा उंची व वयोगटानुसार देण्यात येत आहे. 

 मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शासकीय विश्रामगृह येथे आमदार  मिलिंद नरोटे यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन जनतेने मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे, यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचिन हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके उपस्थित होते.वडसा येथे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थित आमदार  रामदास मसराम यांनी सुद्धा हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन जनतेस गोळ्या घेण्याचे आवाहन केले आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वतः जिल्हाधिकारी  अवीश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद  सुहास गाडे यांनी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेऊन मोहीम यशस्वी करणेसाठी आवाहन केले.

मोहिमेदरम्यान पात्र नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाने निर्धारित केले आहे. त्या अनुषंगाने ७ तालुक्यातील ७२२४२३ पात्र लोकसंखेला हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार (IDA) मोहीमे दरम्यान प्रत्यक्ष औषधोपचार करण्यात येत आहे. त्याकरिता ग्राम पातळीवर ३१०९ कर्मचाऱ्यांची १५६५ पथके गठीत करण्यात आलेली असून त्यांचे पर्यवेक्षणा करिता ३१३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सोबतच गावपातळीवर मोहिमेकरिता लागणारी औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्हातील वृत्तसंकलनापर्यंत 18321 इतक्या लाभार्थी हत्तीरोग विरोधी गोळ्या घेतल्या आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.