Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारू व तंबाखू नियंत्रणासाठी कारवाईत वाढ करा. – सी.ईओ सुहास गाडे

मार्कंडा यात्रा दरवर्षी प्रमाणे दारू, तंबाखूमुक्त करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक यावेळी सीईओ जि.प.सुहास गाडे यांनी  घेतली. यावेळी मागील बैठकीचा अनुपालन आढावा घेत संबधित विभागांना दारू व तंबाखू नियंत्रणासाठी नियोजन करून कायद्यानुसार कृती व दंड करण्याचे आदेश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मागील बैठकीचा कार्यवृत्तांत व अनुपालन अहवालाचे वाचन किलनाके मॅडम यांनी केले. तसेच मुक्तिपथ अभियानाचे झालेले कामे व प्रमुख यश याबाबत सहसंचालक संतोष सावळकर यांनी माहिती दिली. अहवालातील मुद्द्यानुसार आढावा घेत सीईओ सुहास गाडे सर  यांनी शिक्षणाधिकारी यांना सूचना देत, जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या पाहिजे. त्यासाठी तंबाखूमुक्त शाळा निकषानुसार शाळा मुख्याध्यापकाने, नोडल ऑफिसरने कृती करावी. मुक्तिपथ व NTCP चमूने सहकार्य, तपासणी व त्यासाठी आवश्यक कृती करावी.  कोट्पा कायद्याचा अवलंब करावा. दोषी व्यक्तीला दंड करावा असे सांगितले.
तसेच दरवर्षी प्रमाणे होणारी मार्कंडा यात्रा दारू व तंबाखू मुक्त करावी, मुक्तिपथने पोलिस विभागाच्या मदतीने कृती करावी, जिल्ह्यातील इतर ठिकाणी होणार्‍या यात्रा सुद्धा दारू तंबाखूमुक्त झाल्या पाहिजे यासाठी कृती संबधित विभागाने करावी अशा सूचना दिल्या. सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त असावे, NTCP व मुक्तिपथ चमू व पोलिस असे पथक करून संबधित कार्यालयात भेट व तपासणी करून नियमांनुसार दंड करण्याचे निर्देश दिले. आढावा बैठकी नंतर जि.प.इमारती मधील सर्व विभाग व मैदानावर सुरू असलेल्या खेळ स्पर्धेच्या ठिकाणी तपासणी, दंड त्वरित करावी असे आदेश दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच जिल्हाभरात स्थापन केलेल्या मुक्तिपथ ग्राम पंचायत समितीने अवैध दारू व तंबाखू नियंत्रण करिता कायदेशीर पद्धतीने ग्राम पंचायत पातळीला, गावात कृती करावी. सरपंच व पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन कृती करावी, गरजेनुसार पोलिस विभागाची मदत घ्यावी. अन्न औषध विभागाने सुगंधित तंबाखू विक्री विक्रेत्यावर कारवाया कराव्या, वाढवाव्या, पुढील बैठकीत अहवाल सादर करावे इत्यादी प्रकारचे कडक निर्देश यावेळी संबधित विभागांना देऊन त्वरित कृती करण्याचे आदेश दिले. सीईओ सुहास गाडे यांचे परवानगिने बैठकीची सांगता करण्यात आली.
या बैठकीला उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, मुक्तिपथचे  कमलकिशोर खोब्रागडे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या मीना दिवटे व दिनेश खोरगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे, मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या सल्लागार प्रेरणा राऊत, बाबासाहेब पवार शिक्षणाधिकारी प्राथमिक, वासुदेव भुसे शिक्षणाधिकारी माध्यमिक, पोलिस विभागाच्या सरिता मरकाम, अन्न व सुरक्षा विभागाचे सुरेश तोरेम, इत्यादी प्रमुख अधिकारीसह इतर विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.