आरे कॉलनीत ‘भारतीय संविधान आणि आम्ही’ कार्यक्रम संपन्न
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई : आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ येथील जेतवन सांस्कृतिक केंद्रात ‘भारतीय संविधान आणि आम्ही’ या विषयावर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विधी विभागाचे प्रा. डॉ. देव कुमार जेकप, दैनिक सकाळचे पत्रकार नितीन बिनेकर, मर्जी संघटनेचे प्रमुख मंगेश सोनावणे, तसेच माजी पोलीस अधिकारी दत्तात्रय गंगावणे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या महत्त्वावर वक्त्यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेतवन सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष दिलीप बैसाणे आणि उपाध्यक्ष विरेंद्र (नाना) सोनावणे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन संघटनेच्या समन्वयक वैष्णवी मापगावकर आणि दिनेश रामण यांनी केले, तर अनुजा तिवारी यांनी मर्जी संघटनेच्या कामकाजाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यालयीन सचिव राकेश तुळसकर, विधी शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी कदम, तुषार ढिवरे, वंदना झेवियर्स, अमोल मनोहर, अयूब शेख, विजया बाबर, दिपक घेवदे, दिपक शिंदे, एडलिन फर्नांडिस, सुनिल विश्वकर्मा, हर्षली शिवलकर आदींनी विशेष योगदान दिले.
Comments are closed.