Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनपरिक्षेञ कार्यालय गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, ०९ मार्च  : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेञ कार्यालय गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. अरविंद पेंदाम वनपरिक्षेञ अधिकारी गडचिरोली व मा. माया गेडाम लेखापाल यांनी राष्ट्रमाता साविञीआई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिपप्रज्वलित करून त्यांच्या स्ञीमुक्ती बाबत जिवनकार्यावर प्रकाश टाकला.

जागतीक महिला दिनाची दिली विस्तृत माहिती 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑगस्ट १९१० मध्ये डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे समाजवादी द्वितीय आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेपूर्वी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या महिला परिषदेत अमेरिकन समाजवाद्यांच्या प्रेरणेने, जर्मन प्रतिनिधी क्लारा झेटकीन, केट डंकर आणि काही इतर प्रतिनिधींनी वार्षिक ‘महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव माडला. त्या दिवसापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.

१९१० मध्ये कोपनहेगन येथे कार्यरत महिलांची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद भरली. क्लारा झेटकीन (जर्मनीतील सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या ‘महिला कार्यालयाच्या नेत्या) नावाच्या महिलेने आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली. तिने प्रस्तावित केले की प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात एकाच दिवशी एक उत्सव साजरा केला जावा. कारण महिलांच्या मागण्यांसाठी दबाव टाकता यईल. १७ देशांतील १00 हून अधिक महिलांची जेटकीनच्या सूचनेला सर्वानुमते मंजुरी देऊन स्वागत केले आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची माहिती देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अरूप कन्नमवार क्षेञसहायक गुरवळा, श्रिकांत नवघडे क्षेञसहायक गडचिरोली धर्मराव दुर्गमवार वनरक्षक येवली, इत्यादी वनकर्मचारी हजर होते. तेव्हा मा. संगिता मेश्राम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

हे देखील वाचा ,

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, उत्कृष्ट महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार

गॅस सिलेंडरचा स्पोट! मायलेकींचा होरपळून मृत्यू

Comments are closed.