Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेबी मडावी महीला मेळाव्यात महिलांना देण्यात आला विविध योजनांचा लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

गडचिरोली दि ०९ मार्च : एत्तापली येथे पोलीस अधीक्षक  अंकित गोयल ,  अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे .,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख ,अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, संकल्पनेतून व  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.श्री सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  भव्य  बेबी मडावी-महीला मेळावा-2022 चे आयोजन करण्यात आले.

या महीला मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय एटापल्ली डॉ. क्रांती राऊत  ह्या उपस्थित होत्या, सोबतच   दिपयंती पेंदाम नगराध्यक्षा एटापल्ली तसेच सर्व महिला नगरसेविका सदर मेळाव्यास उपस्थित होत्या. सदर महिला मेळाव्यात उपस्थित पाहुणे व नवनिर्वाचित महिला नगरसेविका  यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,जिजामाता,व वीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला त्यानंतर नगरपंचायतमधील नवनिर्वाचित नगरसेविका यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मेळाव्या दरम्यान महीलाना विविध गृहपयोगी साहीत्य तसेच  साड्या  वाटप करण्यात आल्या.तसेच अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र व बस सवलत कार्ड वाटप करण्यात आले. तसेच महिला मेळाव्या दरम्यान  संगीत खुर्ची, रांगोळी ,मेणबत्ती पेटवणे अशा विविध स्पर्धेचे आयोजन करुन  प्रथम ,द्वितीय , त्तृतिय क्रमांक पटकवणि-या स्पर्धकांना योग्य ते बक्षीस देण्यात आले.

 

तसेच सदर महीला मेळाव्या दरम्यान सर्व उपस्थित महिलांना पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.या मेळाव्यात पॅन कार्ड,जातीचा दाखला,बँक खाते ,जीवणज्योति सुरक्षा विमा,प्रधानमंत्री सुरक्षा विमा  आदी .योजनांचा लाभ देण्यात आला.मेळाव्याची सांगता राष्ट्रगीत सन्मानाने गाऊन करण्यात आली, आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक  धनगर यांनी केलं कार्यक्रमाचे यशस्वीतेकरितापोलीस निरीक्षक विजयानंद पाटील व पोलीस कर्मचारी  यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 हे देखील वाचा ,

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ९३ लाख मंजूर – विजय वडेट्टीवार

गॅस सिलेंडरचा स्पोट! मायलेकींचा होरपळून मृत्यू

 

Comments are closed.