Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवसंकल्पनासोबत तरूण युवकांनी स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 19 ऑगस्ट :-  राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्ट-उप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यांत आले आहे. या माध्यमातून नवसंकल्पना घेऊन येणा-या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.उत्तम संकल्पना सादर करणा-या युवकांना 10 हजार रूपयापासून ते 1 लाख रूपयापर्यंतची पारितोषिक दिली जाणार आहे. स्टार्टअप यात्रेतील मोबाईल वाहन प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमुह एकत्रित होणा-या जागा आदी ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअप विषयी जनजागृती करेल. नाविन्यपुर्ण संकल्पना असलेल्या नागरीकांची नोंदणी करून त्यांना माहिती देण्यांत येईल. तसेच यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यांत आले आहे.

कृषी,शिक्षण,आरोग्य,शाश्वत विकास,स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता ही प्रशासन आणि इतर विषयातील नवनवीन संकल्पनांना स्टार्टअप यांना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्हयातील सादरीकरण सत्रातील उत्तम संकल्पनेचे राज्यस्तरीय तज्ञ समिती समोर अंतिम सादरीकरण होईल. व जिल्हयामध्ये उत्तम 3 विजेल्याची निवड केली जाईल. प्रथम बक्षीस 25 हजार, व्दितीय बक्षिस 15 हजार तर तृतीय बक्षिस 10 हजार अशी पारितोषिक देण्यांत येईल. विभाग स्तरावर 6 सर्वोत्कृष्ट नवउद्योजकांना प्रत्येकी 1 लाख रूपयाचे पारितोषिक दिल्या जाईल. तर राज्यस्तरावर 14 विजेत्यांना पारितोषिके दिली जातील यामध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रूपये तर व्दितीय पारितोषिक 75 हजार रूपये असे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय विजेत्या संकल्पनांना आवश्यक पाठबळ देण्यांत येणार आहे स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्हयातील मार्गक्रमण स्टार्टअप व नाविन्यता यात्रा मार्गक्रमण दिनांक.24 ऑगस्ट 2022 रोजी कोरची व कुरखेडा, दिनांक.25 ऑगस्ट 2022 रोजी वडसा व आरमोरी,दिनांक.26 ऑगस्ट-2022 रोजी धानोरा व गडचिरोली, दिनांक.27 ऑगस्ट-2022 रोजी चामोर्शी व मुलचेरा दिनांक.29 ऑगस्ट-2022 रोजी एटापल्ली व भामरागड व दिनांक.30 ऑगस्ट-2022 रोजी अहेरी व सिरोंचा या सर्व तालुक्याच्या ठिकाणी स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रेचे मार्गक्रमण होणार आहे. त्याकरीता http://bit.ly/EntrepreneurSpeaker , http://bit.ly/YatraJuryMember , http://bit.ly/YatraBootcamps , http://bit.ly/VanStops या लिंकवर नवे संकल्पनासोबत नोंदणी करण्यांत यावी असे माहिती सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी केली आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?

Comments are closed.