Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२१ डिसेंबरला गुरु-शनि महायुती, दोघांची मिळून दिसणार एकच चांदणी.. १६२३ साली आले होते एकत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर: – २१ डिसेंबर रोजी गुरु व शनि एकत्र येत महायुती घडणार असून दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून एकच चांदणी दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था २२ डिसेंबरपर्यंत पाहायला मिळेल. सदर ग्रह ४०० वर्षापूर्वी म्हणजे १६२३ साली
असेच एकत्र आले होते. दरम्यान २०८० मध्ये गुरु व शनि हे पुन्हा एकत्र युतीत येणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून रोज सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर ६ ते ८.३० दरम्यान पश्चिमेच्या आकाशात क्षितिजापासून ३० अंश उंचीवर दोन ठळक चांदण्यासारखे ग्रह दिसत आहेत. या दोन्ही चांदण्या म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह गुरु व शनि आहेत. हे दोन्ही ग्रह दुर्बिणीशिवाय
सहजपणे पाहता व ओळखता येतात त्यांपैकी मोठी चांदणी म्हणजे गुरु ग्रह तर छोटी चांदणी म्हणजे शनि ग्रह होय गुरु हा सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सुर्यापासून सरासरी ७५ कोटी
किमी दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास १२ वर्षे लागतात, तर शनि हा सुर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह सुर्यापासून सरासरी १५० कोटी किमी दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास २९.५ वर्षे लागतात.त्यामुळे पृथ्वीवरून रात्रीच्या
आकाशात पाहताना त्यांची दर २० वर्षांनी युती होतच असते. परिणामी हे दोन्ही ग्रह जवळ आलेले दिसत असल्याचे खगोल अभ्यासक तथा स्काय वॉच गृपचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पण या दर वीस वर्षांनी होणाऱ्या युतीत गुरु व शनि विशिष्ट अंतरावर एकत्र येतात. मात्र यावेळी २१ डिसेंबर २०२० रोजी महायुती घडेल. गुरु व शनि एवढे एकत्र येतील की दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून एकच चांदणी दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था २२ डिसेंबरपर्यंत पाहायला मिळेल. हे ग्रह ४०० वर्षापूर्वी म्हणजे १६२३ साली असेच एकत्र आले होते. २०८० मध्ये पुन्हा एकत्र युतीत येणार आहेत म्हणूनच ही युती दुर्मिळ मानली जात आहे.

घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हीच एकमेव संधी-
२२ डिसेंबर नंतर गुरु ग्रह शनिला ओलांडून पूर्वेकडे वर सरकताना दिसेल. त्या दोन्हीं ग्रहातील अंतर दिवसेंदिवस वाढत जाईल. गुरु शनिच्या महायुतीची ही घटना १६२३ साली घडली होती. त्यामुळे आपणाला या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हीच एकमेव संधी आहे. तेव्हा ही संधी दवडू नका. २१ डिसेंबरपर्यंत या दोन ग्रहांतील अंतर सर्वाधिक कमी असेल परंतु पुढे आठवडाभर ही युती पाहता येणार आहे. दुर्बीण असेल तर त्यातून हे ग्रह सुंदर दिसेल. परंतु साध्या द्विनेत्रीने किंवा साध्या डोळ्याने अंधारातून ही युती चांगली पाहता येणार असल्याचे प्रा.सुरेश चोपणे यांनी नमूद केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.