Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल पीडितांना वन जमिनीचे पट्टे मिळवून देणार- खा. अशोक नेते यांची अहेरी येथिल भेटी दरम्यान ग्वाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहेरी तालुका दौऱ्यादरम्यान खा. अशोक नेते यांनी घेतली प्रभू सदनातील पीडित नागरिकांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ७ मार्च: अहेरी शहरातील प्रभुसदन येथील रहिवासी असलेल्या जनतेच्या समस्या समजुन घेण्याकरीता खा. अशोक नेते यांनी प्रभूसदन नगराला भेट दिली. यावेळी येथील नागरिकांनी सांगितले की,  अहेरी येथील काही खाजगी श्रीमंत लोक येऊन आम्हाला धमकी देतात, ही जागा आमची आहे, तुमच्या घरावर आम्ही बुलडोजर चडवू येथून हाकलुन देऊ, असे बोलतात. आम्ही २५-३० वर्षापासुन या वनजमीनीवर घरे बांधून राहत आहोत. काही लोक नक्षलपीडीत आहेत तर काही आत्मसमर्पित आहेत आम्हाला घरकुल, जागा देउन हे अतीक्रमण कायम करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी खा. अशोक नेते यांच्याकडे चर्चेदरम्यान केली असता याबाबत त्वरीत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांचाशी चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरीचे भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वाखाली प्रभुसदन नगर, अहेरी येथील लोकांनी यावेळी खा. अशोक नेते यांच्याकडे निवेदन दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी बाबुरावजी कोहळे, भाजपा प्रदेश सदस्य, प्रकाश गेडाम, प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, रविभाउ ओलालवार, जिल्हा महामंत्री संघटन, भाजपा गडचिरोली. स्वप्नील वरघंटे, प्रदेश सदस्य,  उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, हर्षाताई ठाकरे, नगराध्यक्ष रहेमाताई सीध्दिकी, मुकेश जी नामेवार. ता. महामंत्री पोशालु चुधरी, अमोलजी गुडेलीवार तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.