Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणला विशेष हक्कभंग!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 10 मार्च : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यामुळे फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष हक्कभंग सूचना मांडली.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप गृहमंत्री देशमुख यांनी केला आणि त्याची दुरुस्ती केली. त्यांची आत्महत्या झाली आहे. असं स्टेटमेंट त्यांच्या पत्नी आणि मुलीने दिलं आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने याबद्दलचे स्पष्ट अभिप्राय नोंदविलेले आहेत. हे प्रकरण दाबले असं म्हणणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे. माझा आणि सुप्रीम कोर्टाचा देशमुख यांनी अवमान केला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसंच, सुप्रीम कोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना माहिती असूनही त्यांनी सभागृहाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सरकारला जाब विचारण्याचा माझा अधिकार आहे त्यापासून माझा हक्क दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विशेष हक्कभंग समितीकडे हे प्रकरणे देण्यात यावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

तसंच, ‘मराठा आरक्षणाच्या बाबत अशोक चव्हाण यांचे विधान असत्य आणि दिशाभूल करणारी आहे. मी त्यांच्याविरोधात विशेषाधिकाराची हक्कभंगाची सूचना मांडतो आहे’, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांनी हे प्रकरण मी तपासून घेईन, असं आश्वासन दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काय घडले होते सभागृहात!

मनसुख हिरेन प्रकरणावर मंगळवारी भाजप आमदारांनी अधिवेशनात जोरदार राडा घातला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर निवेदन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्यासमोर वाझे यांना निलंबित करण्याचं ठरलं होतं पण मग आता कोणावर दबाव आहे? जर वाझे यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला मग तो आता का जाहीर करत नाही’, असं फडणवीस म्हणाले होते.

त्यानंतर सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक याच प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत आहे म्हणून भाजपच्या नेत्यांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते त्यांच्या निलंबनाची मागणी करत आहे, असा आरोप जाधव यांनी केली.

अन्वय नाईक प्रकरणाची आम्हाला चौकशी करायची आहे, हे प्रकरण दाबले गेले आहे” असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते.  त्यानंतर ‘अन्वय नाईक प्रकरणाची काय चौकशी करायची आहे ती खुशाल करा, असं आव्हानच फडणवीस यांनी दिले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.