Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फुलोरा समन्वयक रामदास कोंडागोर्ला यांची पीएचडी संशोधनाकरीता राष्ट्रीय पातळीवर निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी : येथील गट साधन केंद्र येथे फुलोरा समन्वयक पदावर कार्यरत असलेले रामदास बापू कोंडागोर्ला यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली तर्फे आयोजित प्रवेश परीक्षा व मुलाखत यामधून पीएचडी संशोधनाकरीता निवड करण्यात आली. विशेष म्हणजे पत्रकारिता व जनसंवाद या विषयात संशोधनाकरीता देशपातळीवर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवड होणारे ते एकमेव संशोधक ठरले.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त अशा झिंगानूर येथील ते मूळ रहिवासी असून अहेरी तालूक्यात मागील पंधरा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सेवा देत आहेत तर मागील चार वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सुरू असलेल्या फुलोरा – पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या महत्वकांक्षी शैक्षणिक उपक्रमात ते फुलोरा समन्वयक म्हणून यशस्वी भूमिका पार पाडत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता इंग्रजी माध्यमातून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण देण्याकरिता सुरू केलेल्या मॉडेल स्कूल आलापल्ली येथे प्राचार्य पदावर कार्यरत असतांना नीती आयोगाच्या निर्देशानुसार शासनाने शैक्षणिक सत्र 2014-2015 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 43 मॉडेल स्कूल बंद करण्यात आले. सदर मॉडेल स्कूल वाचविण्याकरीता पुकारलेल्या विद्यार्थी व पालकांच्या आंदोलनाला पुढे न्यायालयीन स्तरावर यशस्वी करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावून राज्यातील 43 पैकी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड व धानोरा येथील चार मॉडेल शाळा पुनर्जीवित करण्यात मौलिक योगदान दिले.

त्याचप्रमाणे पंचशील बहुद्देशीय विकास मंडळ, सोशल युथ क्लब, करिअर अकॅडमी, इन्सपायर युथ व मधुबन सूर शिक्षणाचा या विविध माध्यमांमधून गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देवून वेळोवेळी विद्यार्थी व युवकांना प्रेरित केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर पीएचडी संशोधनाकरीता ‘ रोल ऑफ डिजिटल मीडिया फॉर डेमॉक्रॅटिक सोसायटी इन ॲक्स्पिरेशनल डिस्ट्रिक्स ऑफ इंडिया’ या विषयाची निवड केली असून संशोधन पूर्ण झाल्यानंतर याचा फायदा येथील शैक्षणिक व सामाजिक परस्थितीत बदल घडविण्याकरीता होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन, शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा व मित्रपरिवार यांना दिले.

हे देखील वाचा :

अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळेला रिक्त पदांचे ग्रहण

 

Comments are closed.