Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

23 सप्टेंबरला ‘सर्च’ रुग्णालयात प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली , 21 सप्टेंबर : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आरोग्य तपासणीसाठी उपचार घेणे अतिशय महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊपचार करता यावे, याकरिता चातगाव येथील सर्च रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

शनिवार २३ सप्टेंबर २०२३ ला प्लॅस्टिक व पुनर्रचानात्मक शस्त्रक्रिया ओपीडी आयोजित केली आहे, सुप्रसिद्ध प्लास्टिक शल्यचिकित्सक डॉ.श्रीरंग पुरोहित व टीम मुंबई या ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी करतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ओठखंड, फाटलेला  टाळू, चेहऱ्यावरील धमनीविरोधी, तिरपी मान, काखेमधील सूज, जळलेल्या त्वचेचे संकुचन, पुरुषात स्तनांची वाढ, जन्मता: जोडलेली बोटे,  सामान्य पेक्षा जास्त बोटे, मूत्रमार्ग लिंगाच्या खाली उघडणे  या प्रकारचे लक्षणे असणार्‍यांनी ओपीडीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन चातगाव येथील सर्च रुग्णालयाने केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-
https://youtu.be/KfrvVWBQ2lY

Comments are closed.