Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क…. पत्नीसाठी काहीही! पोलीस अधिकारी असल्याचे पत्नीला भासविणाऱ्या तोतयाला पोलिसांनी केली अटक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, १३ डिसेंबर:- पत्नीसाठी कोण काय करेल. याचा कधीच नेम नसतो.  मात्र लॉकडाउनमध्ये आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत पत्नीला खुश करण्यासाठी चक्क पोलिसांचा युनिफॉर्म घालून पुण्यात आलेल्या एकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब महादेव गोयकर (25 रा. गूरव पिंपरी ,थिटेवाडी, नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वानवडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना पोलिसांच्या गणवेशातील एक संशयास्पद व्यक्ती दिसला त्यांच्या खांद्यावर “मपो” ऐवजी मपोसे असे  लावले होते. त्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. त्यामुळे पोलिसांनी भाऊसाहेबाची अधिक चौकशी केली असता त्याने पोलिस नसल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अधिक चौकशीत त्याने सांगितले की,  लॉकडाउन मध्ये आपण पोलिसात भरती झालेलो आहोत असे आपल्या पत्नीला खोटे सांगितले होते. त्यामुळे पत्नीला खरे वाटावे म्हणून तो चक्क पोलिसाचा युनिफॉर्म घालून रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंगच्या परीक्षेसाठी आलो असल्याचे पोलिस तपासात माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.