Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

गडचिरोली पोलिसांनी ८.२२ लाखांचा तंबाखू पकडून आरोपी केली अटक...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्याला गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीसह एकूण ८,२२,७५० रुपये किंमतीचा तंबाखूचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.

गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्श – नाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ही कारवाई केली. पोलीसांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर वडसा येथे आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळ सापळा रचला गेला. तेथील ग्रे रंगाच्या मारुती कंपनीच्या इको वाहनामध्ये हिरव्या रंगाचे होला हुक्का शिशा तंबाखू १३० पॅकेट (एकूण १,७२,२५०/- रुपये) व लाल रंगाचे ईगल हुक्का तंबाखू १५४ पॅकेट (एकूण १,३०,९००/- रुपये) आढळले. याशिवाय वाहनाची जुनी किंमत ३,००,०००/- रुपये असून आरोपीकडे २,१९,६००/- रुपये रोख रक्कम सापडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अटक करण्यात आलेला आरोपी चे नाव ललीत गोपालदास राठी, (४१) रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया आहे. चौकशीत त्याने सांगितले की, पळून गेलेला आरोपी इंद्रकुमार नागदेवे, रा. वडसा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली असून, तंबाखूचा मालक रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया आहे, ज्याने तो विक्रीसाठी त्याच्याकडे सोपवला होता.

सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ५१८/२०२५ नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरु असून पुढील तपास सपोनि. प्रेमकुमार दांडेकर करत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भगतसिंग दुलत, पोअं/राजु पंचफुलीवार आणि चापोअं/दिपक लोणारे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.