Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सफाई कामगारांच्या आमरण उपोषनाला स्थगीती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२४ ऑगस्ट :-आरमोरी  नगरपरिषद अंतर्गत लावण्यात आलेल्या कंत्राटदारामार्फत कामगारांना कामावरून काढून टाकलेल्या त्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. या मागणीसाठी  कामगाराना न्याय मिळण्यासाठी प्रहार  संघटनेचे  आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त कामगाराना घेवून आज दिनांक २४ आगस्ट  सकाळी ११.०० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसताच नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सात दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन प्रहार संघटनेसह सफाई कामगारांना दिल्याने तात्पुरती उपोषनाला  स्थगिती मिळाली आहे.

कामगार राज्यमंत्री व कामगार आयुक्त यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, कामगार राज्यमंत्री ना बच्चू कडू यांच्या आढावा बैठकीत आम्ही कामगारांना कामावर घेण्यास तयार आहोत असे कबूल करूनही व कामगार आयुक्त यांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिल्यानंतरही त्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे  मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी ,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय कामगार आयुक्तांनी आदेश देऊनही कामावर न घेणाऱ्या व आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. अन्यायग्रस्त कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देऊन कंत्राटदार यांच्या चुकीने चार महिने कामावरून खाली राहावे लागल्याने तेवढी नुकसान भरपाई कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्याकडून वसूल करून देण्यात यावी.

शासकीय वाहने नगरपरिषद च्या मालकी हक्काच्या जागेत ठेवण्यात यावे ,बोगस परवाना दाखवून कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे,कामगारांना सर्व शासकीय सोयीसुविधा मंजूर असताना ते न मिळाल्यामुळे ते मंजूर करण्यात यावे,मजुरांचा इ पी एफ दर महिन्याला भरून त्याची मजुरांना रीतसर पावती देण्यात यावी,आदी विविध मागण्यांसाठी प्रहारचे वतीने अन्यायग्रस्त कामगारांना घेऊन आमरण उपोषण केले जाणार आहे व त्यासंबंधी चे निवेदन प्रहार चे आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक यांनी अप्पर जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केले होते .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज दिनांक २४ आगस्टला सकाळी ११वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार सेवक निधील धार्मिक यांच्या नेतृत्वात सफाई कामगार आमरण उपोषणाला बसत असताच  जिल्हाधिकारी याची दखल घेऊन प्रहार  संघटनेचे  आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक , अन्यायग्रस्त कामगाराना पाचारण करून आरमोरी नगरपरीदेच्या सफाई कामगारांची चर्चा करुण सोमवार पर्यंत तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने तात्पुरते जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात येत असलेले उपोषण स्थगीती   करण्यात आले आहे.

यावेळी प्रहार सेवक निखिल धार्मिक गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम,सफाई कामगार सघटन अध्यक्ष अक्षय भोयर,कार्याध्यक्ष पुषोतम बदोले, सुभाष रामटेके, अविनाश ऊईके, राजेश मुन, सुनिल मेत्राम भाऊराव दिवटे सचिन बोदलकर हरीदास गराडे रीना बाबोळे रेखा कांबळे.कुसुम मेत्राम ताराबाई खोब्रागडे ‌विजेता खोब्रागडे यासह मोठ्या संख्येनी उपोषण करते उपस्थित होते.

 

हे देखील वाचा,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश

शिवसेनेतर्फे अहेरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात हल्ला बोल निदर्शने व निषेध करून निवेदन सोपविले

जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निरोप,गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी संजय मीना रूजू

Comments are closed.