प्रा. निलेश दुर्गे यांना पीएच.डी.; गोंडवाना विद्यापीठात मौखिक परीक्षा यशस्वी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली येथील प्रा. निलेश दुर्गे यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पीएच.डी.साठीची मौखिक परीक्षा (व्हायवा) यशस्वीरीत्या पूर्ण केली असून विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.
डॉ. प्रकाश बी. तितरे (भद्रावती) यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण झाले असून डॉ. माधव शिंदे (अहिल्यानगर) यांनी बहिःस्थ परीक्षक म्हणून परीक्षेचे परीक्षण केले.
संशोधनातील विषयनिवड, सखोल विश्लेषण आणि स्थानिक समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे प्रा. दुर्गे यांचा प्रबंध विद्यापीठ समितीच्या सर्व निकषांवर खरा उतरला. त्यांचे यश ग्रामीण भागातील युवा शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या यशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल नोंदवले गेले असून प्रा. दुर्गे आणि त्यांचे मार्गदर्शक यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Comments are closed.