Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहावी बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकसपर्श नेटवर्क 

गडचिरोली – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला आहे.

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात झेरॉक्स मशीन, फॅक्स, एसटीडी बुथ यांसारख्या सुविधांना तसेच परीक्षेच्या दरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा यांसारख्या उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी, गाणी, वाद्य वाजवणे, भाषण करणे तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात चुन्याची रेषा आखण्यात येणार असून, कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना किंवा वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस यंत्रणेला योग्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी हा आदेश परीक्षेच्या कालावधीत अमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.