Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिव्यांग कल्याणासाठी परिणामकारक योजना प्रस्तावित करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

जिल्हा नियोजनचा १ टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार असून त्यातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणाऱ्या परिणामकारक आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रस्ताव सूक्ष्म नियोजनासह तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात  पंडा यांनी आज घेतला. सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मानसी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजित राऊत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी  पंडा यांनी दिव्यांग नागरिकांसाठी तयार करायचे ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) वाटपाच्या प्रगतीबाबत विचारणा करून प्रलंबित ओळखपत्र तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत ‘नमो दिव्यांग शक्ती अभियान’, ‘निरामय आरोग्य विमा योजना’, युडीआयडी कार्ड नोंदणी मोहिम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्याचे उपक्रम तसेच नवजात बालकांसाठी श्रवण तपासणी युनिट, सहाय्य उपकरणांचे वाटप, आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांचा देखील आढावा त्यांनी घेतला .

अभिजित राऊत व चेतन हिवंज यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीची माहिती दिली. यावेळी आरोग्य सेवा व समाजकल्याणचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.