Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी : जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने अहेरी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी मुंगमोडे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. या प्रसंगी केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी तथा गटसाधन केंद्रातील कर्मचारीवृंद सहभागी झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रॅलीत भगवंतराव हायस्कुल, कै च. ल मद्दीवार उच्च प्राथमिक शाळा, धर्मराव कृषि विद्यालय, मानव दयाल हायस्कुल, मानव दयाल माध्यमिक आश्रम शाळा,एकलव्य मॉडेल स्कुल, मानव दयाल उच्च प्राथमिक आश्रम अहेरी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

रॅलीची शुरुवात दानशूर चौकातून तर समारोप मानव दयाल माध्यमिक शाळेत झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम मेश्राम तर समारोप आयोजक म्हणून प्राचार्य वितोंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी आर सी चे विशेष तज्ञ किशोर मेश्राम, राजू नागरे, साधन व्यक्ती ताराचंद भुरसे, ज्ञानेश्वर कापगते, संसाधन शिक्षक पंकज मानकर यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

गडचिरोली पोलीस दलातर्फे उपपोस्टे रेगुंठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन

मोठी बातमी :- गडचिरोलीतील नरभक्षक T6/G5 वाघीण पकडण्याची मोहीम स्थगित होणार..?

 

 

https://fb.watch/hhsIndVGF3/

 

 

Comments are closed.