गडचिरोलीत पावसाचा कहर ; दोन दिवसांत दोन बळी, भामरागडचा संपर्क तुटला,
हवामान विभागाने येलो अलर्ट केला जारी ...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने तालुक्याचा मुख्यालयासह जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रशासनाने ये लॉर्ड जारी केला आहे. जिल्ह्यातील तब्बल १३ महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, पुराच्या पाण्याने दोन दिवसांत दोन बळी घेतले असून खंडी नाल्यात १९ वर्षीय तरुण वाहून गेला तर सीपनपल्ली नाल्यात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मृतावस्थेत आढळले.
गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. भामरागड तालुक्यात इंद्रावती, पामुलागौतम, पर्लकोटा तिन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्ग 130 डी वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.जिल्ह्यातील १३ प्रमुख मार्ग पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असले तरी या पावसाने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत. कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा हा खंडी नाल्यातून जात असताना वाहून गेला. तर सीपनपल्ली नाल्यात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पल्लेचे मुख्याध्यापक यांचे तलांडी अखेर मृतावस्थेत सापडले आहे प्रशासनाला माहिती होताच तलाठी, कोतवाल आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून महसूल विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यातील पुरामुळे बंद असलेले मार्ग खालीलप्रमाणे,
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी) तालुका भामरागड
2) सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (सोमनपल्ली नाला) तालुका सिरोंचा
3) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी
4) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला) तालुका चामोर्शी
5) शंकरपूर ते विठ्ठलगाव रस्ता प्रजिमा-1 तालुका देसाईगंज
6) कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -49 तालूका देसाईगंज
7) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-47 तालुका देसाईगंज
8) भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-17 (हळदीमाल नाला
9) हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-24 तालुका भामरागड
10) मनेराजाराम ते दामरंचा रस्ता (बांडिया नदी) तालुका भामरागड
11) कोपेला झिंगानूर रस्ता तालुका सिरोंचा
Comments are closed.