Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपाने ऋतुजा लटके यांच्या विरूध्दची उमेदवारी मागे घेतल्याने राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 17 ऑक्टोबर :-  महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक परंपरा जपत आज भाजपाने ऋतुजा लटके यांच्या विरूध्दची उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला आहे. भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीतुन माघार घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय परंपरेचे पालन करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपा मध्ये वेगवाग घडामोडी घडल्या आणि अखेर ऋतुजा लटकें विरोधातील मुराजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.

राज ठाकरें यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि, काल केलेल्या विनंतीला मान देउन आपण अंधेरी पोटनिवडणूक उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपले, आपल्या सहकार्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार. चांगली, सकारात्मक संस्कृति सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय मंचावर आपापले मुद्ये घेउन निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून आम्ही कायमच करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

पाणीसाठा करण्यासाठी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ९६ टक्के मतदान

Comments are closed.