रासेयो शिबीर म्हणजे सेवा संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी : “राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर म्हणजे सेवा संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र होय” असे प्रतिपादन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर घोसरे यांनी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी सलग्नित राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन चेरपली या गावात दिनांक 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार असून “सशक्त भारत व डिजिटल साक्षरते करिता युवाशक्ती” या संकल्पनेवर आधारित आहे. उद्घाटन समारंभ दिनांक 20 जानेवारी 2025 ला पार पाडण्यात आला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एम के मंडल यांनी शिबिराचे महत्त्व पटवून दिले तर प्रास्ताविक प्राध्यापक शामल विश्वास रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केला. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक सुधाकर भोसले, रा से यो चे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. तानाजी मोरे, वरिष्ठ प्रा. रमेश हलामी व डॉ सुनंदा पॉल हे उपस्थित होते व याप्रसंगी मार्गदर्शन केले. संचालन कुमारी दिव्या कविराज वार व सानिया नाज शेख यांनी केला तर आभार प्रदर्शन डॉक्टर अरविंद राठोड यांनी परिपूर्ण केला. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा. कांचन धूर्वे, प्रा. अनिकेत गोंडे , प्रा. कुणाल बनकर, प्रा.आदेश मंचालवार, प्रा. व्यंकटेश इप्पाला, शिक्षकेतर कर्मचारी , एन एस एस चे स्वयंसेवक व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.
Comments are closed.