Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा” – खा. डॉ. नामदेव किरसान यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

चामोर्शीत तालुका स्तरीय आढावा बैठक; रस्ते, पाणी, आरोग्य, घरकुल आदी मुद्यांवर भर...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली (दि. १७ मे) : चामोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या. चामोर्शी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. किरसान होते.

या बैठकीस जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठकीत बोलताना डॉ. किरसान म्हणाले, “सर्वसामान्य नागरिक आपल्या अडचणी घेऊन दूरवरून येतात. त्यांना दिरंगाई किंवा अवहेलना नको. त्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, हीच खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.”

या मुख्य मुद्यांवर झाली चर्चा..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

*घरकुल धारकांना रेतीचे तत्काळ वाटप…

*थकीत घरकुल हप्त्यांचे वितरण…

*वनजमिनीवरील पट्टे वाटपाचे प्रलंबित प्रकरण निकाली काढणे…

*मान्सूनपूर्व जनावरांचे लसीकरण..

*प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा सुधारणा..

डॉ. किरसान यांनी विविध खात्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रत्येक विभागाला स्पष्ट सूचना दिल्या. प्रशासनाने नागरिकांशी संवाद वाढवावा आणि योजनांची अंमलबजावणी गतीने करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत अनेक मान्यवरांची उपस्थिती..

या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. विश्वजीत कोवासे, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, ज्येष्ठ नेते राजेश ठाकूर, नगरपरिषद उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, पाणीपुरवठा सभापती सुमेध तुरे, तसेच अनिल कोठारे, निकेश गद्देवार, रवींद्र पाल, नीलकंठ निखाडे, मुन्ना गोंगले, बिजन सरदार, रमेश कोडापे यांसह विविध गावांतील नागरिक, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Comments are closed.